अकोला : पेट्रोल व डिझेल दरवाढविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत पेट्रोल व डिझेलचे दर किमान २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी ‘एआयएमआयएम’ अकोला जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाच्या पेट्रोलियम विभागाकडे सादर केले.
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढ विरोधात ‘एआयएमआयएम’ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व पेट्रोल आणि डिझेलचे दर कमीतकमी २५ टक्के कमी करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय पेट्रोलियम विभागाचे सचिव व राज्य शासनाच्या विक्रीकर विभागाचे सचिव यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष जमील खान, इलियास बेग, सय्यद शकील, मोहम्मद अलीम, सुनील वानखडे, शेख अनिस, आरीफ खान अमजत खान, अनवर हुसेन, आरीफ सेठ, मोहम्मद अकरम, मोहम्मद सलीम, मोहम्मद जावेद आदी उपस्थित होते.
.......................फोटो...............................