अजीत पवारांनी घेतला अकोला जिल्हयाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 06:52 PM2018-12-22T18:52:54+5:302018-12-22T18:53:11+5:30

अकोला : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने कामाला लागली असून यासाठीच माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजीत पवार यांनी शुक्रवारी मुंबईत अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा घेतला.

Ajit Pawar took review of Akola district | अजीत पवारांनी घेतला अकोला जिल्हयाचा आढावा

अजीत पवारांनी घेतला अकोला जिल्हयाचा आढावा

googlenewsNext


अकोला : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने कामाला लागली असून यासाठीच माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजीत पवार यांनी शुक्रवारी मुंबईत अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा घेतला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदार संघ आणि इतर बाबींचा अहवाल जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी सादर केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची वारे जोरात वाहु लागले असून अजित पवार यांनी शुक्रवारी मुंबईत अकोला जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी हा अहवाल सादर केला. संग्राम गावंडे यांनी गेल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने जनसमस्यांवर केलेल्या विविध आंदोलनांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती, सामाजीक समीकरणासह राष्ट्रवादीसाठी असलेले पोषक वातावरणाची माहिती दिली. यावेळी अजित पवार यांनी लोकसभा आणि विधानसभेत सत्ता परिवर्तनासाठी कामाला लागण्याचे निर्देष दिले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तवीले. भाजप-शिवसेना सरकारने जनतेचे भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे जनतेमध्ये या सरकारप्रती प्रचंड असंतोष असल्याचा मुद्दा पवार यांनी या बैठकीत मांडला. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक होत जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्येण्याचा सल्लाही पवार यांनी संग्राम गावंडे यांना दिला.

Web Title: Ajit Pawar took review of Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.