महापालिका क्षेत्रात घराेघरी काेराेनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत़ मार्च महिन्यात दुकाने उघडी करण्यासाठी व्यावसायिकांना व त्यांच्या दुकानांमधील कामगारांना काेराेना चाचणी अनिवार्य करण्यात आली हाेती़ त्यामुळे चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली हाेती़. परिणामी, काेराेनाबाधितांचाही आकडा समाेर येऊ लागला हाेता़. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत दैनंदिन चाचणी करणाऱ्यांची संख्या सुमारे २ हजारांपेक्षा अधिक हाेती. मे महिन्यात चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत घसरण आली आहे. मागील आठवडाभरापासून हा आकडा ९०० च्या घरात आला आहे. शनिवारी ९०५ जणांनी चाचणी केली असून यामध्ये केवळ २८१ जणांनी आरटीपीसीआर तसेच ६२४ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली आहे.
म्हणून बाधितांची संख्या झाली कमी !
काेराेनाची लक्षणे आढळून येणारे संशयित रुग्ण काेराेना चाचणी न करता दुखणे अंगावर काढत आहेत. चाचणी न केल्यास अधिकृत बाधितांची संख्याही आपसूकच कमी होणार असून ही धाेक्याची घंटा मानली जात आहे.