पूर्व,दक्षिण झाेन बेलगाम
फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासून शहरात काेराेना बाधीत रुग्णांचा आकडा वाढीस लागल्याचे समाेर आले आहे. यातही काेराेनाचा सर्वाधिक प्रादूर्भाव पूर्व व दक्षिण झाेनमध्ये असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पूर्व झोनमध्ये १३४, पश्चिम झोनमध्ये ३६, उत्तर झोन अंतर्गत ३२ व दक्षिण झोन अंतर्गत ५१ असे एकुण २५३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अकाेलेकरांनाे चाचणीसाठी पुढाकार घ्या!
शहरात काेराेनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता कुटुंबातील ज्येष्ठ,वयाेवृध्द नागरिकांच्या जीवीताला धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे घराबाहेर निघताना व कामाच्या ठिकाणी अथवा बाजारपेठेत वावरताना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सर्दी,घशात खवखव, ताण येणे आदी लक्षणे आढळल्यास त्वरीत काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.