अकोला न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला शाखोच्यावतीन मंगळवारी सिव्हिल लाईन चौकात राज्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. छत्रसंघ निवडणूका खुल्या पद्धतीने व्हाव्यात , शिक्षणाचे बाजारीकरण थांबावे , विद्यापीठात चालत असलेला भोंगळ करभरसंदर्भात, मागील कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांची थकीत असलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणे, २0१६ चा नवीन विद्यापीठ कायदा मार्च २0१७ पासून लागू झाला. परंतू आजतागायत खुल्या निवडणुकांबाबत सरकारची उदासीनता, सेमिस्टर पॅटर्न बंद करणे आदि विषयांना अनुसरून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला शाखोच्यावतीने सिव्हिल लाइन चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रांत उपाध्यक्ष प्रा. डॉ. राजीव बोरकर, जिल्हा संयोजक सोहम कुलकर्णी, महानगर अध्यक्ष प्रा. उमेश कुडमेथे, महानगर मंत्री वसिष्ठ कात्रे, के. डी. राठोड, गुलशन तिवारी, मनीष डामरे, राहुल जाधव, सुमित इंगळे, विशाल राजगुरू, महेश इंगळे, श्रीनाथ जोशी, ऋषिकेश अंजनकर, सारंग देव, यश कराळे, राहुल पुंडे, हृषीकेश हिंगणे, गणेश तिवाले, योगेश चव्हाण, योगेश पाटील, सौरव राठोड, अक्षय ओलोकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमतेच्या निर्मितीची प्रक्रिया खंडित झाली आहे. निवड प्रक्रियेतील महाविद्यलयीन निवडणुके मुळे महाविद्यालयातून चांगल्या राजकीय नेतृत्व निर्मितीस मदत होत नाही.याकरताच खुल्या पद्धतिच्या माहाविद्यालयीन निवडणुकांची मागणी होत आहे. सरकार ला मागणी आहे खुल्या माहाविद्यालयीन निवडणुका लवकरात लवकर लागु झाल्या पाहिजेत. नाहीतर तावडेंना अभाविप विदर्भात फिरू नाही देणार- वसिष्ठ कात्रे, महानगर मंत्री, अभाविप अकोला