अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. या कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या ८१३ वर पोहोचली असून, त्यामध्ये १८ वर्षाखालील जवळपास १० टक्के बालकांचा समावेश आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.दोन महिन्यांपासून शहरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. रुग्णांमध्ये सर्वाधिक आकडा १८ ते ३५ व ३५ ते ५० वयोगटातील आहे. तर मृत्यूदर हा ५० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांमध्ये असून, या रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्याही समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे.रुग्णांच्या वाढत्या संख्यामध्ये चिमुकल्यांचा ही आकडा लक्षणीय वाढत आहे.१८ वर्षे वयोगट खालील जवळपास शंभर मुला-मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे. ही चिंतेची बाब असून, चिमुकल्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
तीन ते चार टक्के रुग्णांनाच लक्षणअठरा वर्षाखालील बहुतांश बाधित रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नसल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. केवळ तीन ते चार टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचेही निदर्शनास आले.विशेष काळजी घ्या!१८ वर्षाखालील बालकांमध्ये कोरोनाचा वाढता धोकाबालकांना घराबाहेर निघणे टाळावारंवार हात स्वच्छ धुण्यास सांगामास्कचा वापर करामोठ्यापासून मुलांना दूर ठेवा