अकोला: टाळेबंदीत प्रथमच गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत अकोला कृ षी उत्पन्न बाजार समितीत २,१०० क्विंटल तुरीची विक्री झाली. शेतकऱ्यांना गुरुवारी प्रति क्विंटल सरासरी ५,२५० तर शुक्रवारी ५,३०० रुपये दर मिळाले. पहिल्या टप्प्यातील २१ दिवसांच्या टाळेबंदीनंतर आता दुसºया टप्प्याची टाळेबंदी सुरू आहे. पहिल्या टाळेबंदीत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर शेतमाल खरेदी बंद होती. बाजार समित्यांमध्येही केवळ जीवनावश्यक वस्तंूचीच खरेदी-विक्री सुरू होती; परंतु शेतकऱ्यांकडे तूर, हरभरा, सोयाबीन, कापूस व इतर भरड धान्य, शेतमाल पडून होते. त्यामुळे शेतकºयांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यानुषंगाने शेती अर्थचक्राला गती देण्यासाठी सूट देण्यात आली आहे. गत २० एप्रिलपासून बाजार समित्यांमध्ये हे व्यवहार सुरू झाले आहेत. अकोला कृ षी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सुरू झाली असून, टाळेबंदीच्या ३१ दिवसांत गुरुवारी ७०३ क्विंटल तुरीची आवक झाली. सरासरी प्रति क्विंटल ५,२५० रुपये दर शेतकºयांना मिळाले. जास्तीत जास्त दर हे ५,३५० रुपये प्राप्त झाले. शुक्रवारी १,४०२ क्विंटल तूर शेतकºयांनी विक्रीला आणली होती. शुक्रवारी शरबती गहू ५४ क्विंटल विक्रीस आला होता. त्याला सरासरी २,४५० तर जास्तीत जास्त २,६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. लोकल ज्वारीची केवळ ३ क्विंटल आवक होती. दर प्रति क्विंटल सरासरी २,४०० रुपये मिळाले. तांदूळ ८ क्विंटल खरेदी करण्यात आला. प्रति क्विंटल दर होते, सरासरी ४,३०० रुपये, जास्तीत जास्त ५००० तर कमीत कमी दर मिळाले २,७०० रुपये. कृ षी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धान्य शेतमाल नोंदणीचे दिवस ठरविले असून, बुधवारी नोंदणी केलेल्या शेतमालाची गुरुवारी खरेदी-विक्री झाली आणि गुरुवारी नोंदणी केलेल्या शेतमालाचे शुक्रवारी खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. कापूस खरेदीही सुरू करण्यात आली आहे; परंतु तुरीला मिळणारे दर येथे हमीपेक्षा कमी आहेत. हरभरा खरेदीही वाढली आहे; पण शेतकºयांना मिळणारे दर कमी आहेत.