लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोलकाता येथील शेअर बाजारात संशयास्पद उलाढाल करणार्या फर्ममध्ये अकोल्यातील आहुजा आणि मोटवाणी हे उद्योजक आढळल्याने प्राप्तिकर विभागाने या उद्योजकांच्या ग्रुपमधील २१ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी सर्च सुरू केला. नागपूरच्या प्राप्तिकर विभागाच्या २00 अधिकार्यांनी बुधवारी सकाळी सहा वाजतापासून आहुजा आणि मोटवाणी परिवाराच्या कोठडी बाजार, न्यू किराणा बाजार, अलंकार मार्केट, कॉटन मार्केट आणि एमआयडीसीतील फर्मचा ताबा घेतल्याने व्यापारी वतरुळ हादरले आहे.या दोन्ही ग्रुपच्या बेहिशेबी मालमत्ताची तपासणी करण्यासाठी नागपूर प्राप्तिकर विभागाचे सहायक संचालक मुदलियार यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळीही सर्च मोहीम सुरू झाली. विविध खासगी वाहनातून आलेल्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्यांनी अकोल्यातील एकूण २१ फर्मचा एकाच वेळी ताबा घेतला. पोलीस बंदोबस्तात हा ताबा घेण्यात आल्याने ही बाब वार्यासारखी शहरात पसरली. सकाळी सहा वाजता सुरू झालेली सर्च मोहीम काही ठिकाणी सायंकाळी थांबविली गेली, तर काही ठिकाणी वृत्त लिहेपर्यंत ही सर्च मोहीम सुरूच होती. नागपूर-अकोलासह विदर्भातील विविध ठिकाणचे अधिकारी या मोहिमेत प्रामुख्याने सहभागी झाले होते. या व्यवहारातील स्टेट ब्रोकर राजेश प्रेमानी याला सर्वप्रथम अधिकार्यांनी सोबत घेतले. त्यानंतर ही सर्च मोहीम सुरू झाली.
प्राप्तिकरचे ‘डीआय’ काजला येणार!आहुजा आणि मोटवाणी यांच्या सर्च मोहिमेत मोठे घबाड आढळून आल्याची माहिती वरिष्ठांकडे पोहोचल्याने प्राप्तिकर विभागाचे तपास संचालक (डायरेक्टर ऑफ इन्व्हेस्टीगेशन ) काजला गुरूवारी अकोल्यात येत आहेत. शहरातील एका मोठय़ा हॉटेलमध्ये त्यांच्या नावे कक्ष आरक्षित करण्यात आला आहे. तोपर्यंत नागपूर प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त मुदलियार यांच्या नेतृत्वात अधिकार्यांची टीम अकोल्यात तळ ठोकून सर्च मोहीम सुरू ठेवणार आहे.
कोलकाता शेअर बाजारातील उलाढालीमुळे उजेडात आले घबाड!कोलकाता येथील शेअर मार्केटच्या स्टॉकमध्ये संशयास्पद उलाढाल करणार्या देशभरातील फर्मची चौकशी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्यांनी सुरू केली. नोटाबंदीच्या कार्यकाळात पाच कोटी रुपयांच्या मुद्रांकाच्या खरेदीचा संशयास्पद व्यवहार करणार्यांमध्ये मोटवाणी ग्रुप आढळून आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.