अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून , सोमवार, २८ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७२८८ झाली आहे. दरम्यान, रविवारी कोरोनामुळे निधन झालेल्या एक रुग्णाची सोमवारी नोंद घेण्यात आल्यामुळे मृतकांचा आकडा वाढून २२६ वर पोहचला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २५२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १० जणांसह सिंधखेड, गौरक्षण रोड, विठ्ठल नगर व जीएमसी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, सिव्हील लाईन, वडाळी देशमुख, अकोट, तेल्हारा, शास्त्री नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, टी फॅक्टरी, पोळा चौक, बोरगाव मंजू, बाळापूर, लहान उमरी, अकोली जहागीर, गोडबोले प्लॉट, गोकूल कॉलनी, ओझोन हॉस्पीटल जवळ, जोगळेकर प्लॉट, मलकापूर, डाबकी रोड, जठारपेठ, शिवाजी नगर, कपिला नगर, व्यकेटेश नगर, शास्त्री नगर, पिंपरी, धामोरी, भगोरा, सिरसो, निर्सग अर्पाटमेन्ट व गुडधी येथील प्रत्येकी एक अशा ५९ रुग्णांचा समावेश आहे.१,६३० अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,२८८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,६३० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अकोला : कोरोनाचे आणखी ५९ रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:47 PM