अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून,शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २१८ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६९७९ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, डाबकी रोड, कौलखेड, अकोट येथील प्रत्येकी तीन्, सिरसो ता.मुर्तिजापूर, चोहट्टा बाजार, जऊळका येथील प्रत्येकी दोन, लहान उमरी, वाशिम बायपास, न्यु खेतान नगर, मोठी उमरी, जूने शहर, गोकूल कॉलनी, तापडीया नगर, सिंधी कॅम्प, अकोली जहागीर, बोर्डी ता. अकोट व करोडी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
७५ वर्षीय महिलेचा मृत्यूशुक्रवारी आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. वाशिम बायपास, अकोला येथील ७५ वर्षीय महिला असून, त्यांना २४ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार घेताना मृत्यू झाला.१,६१७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६,९७९ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५१४४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २१८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,६१७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.