अकोला : सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या निर्देशानुसार अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी गत चार दिवसांपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन मंगळवारी दुपारी मागे घेतले. त्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठप्प झालेले शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार मंगळवारी दुपारी १ वाजतापासून पूर्ववत झाले.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतमालाची उतराई-भराई, मोजमाप (काटा) करणे इत्यादी कामाचे दर वाढवून देण्याच्या प्रलंबित प्रश्नांवर बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी २० फेबु्रवारी रोजी दुपारपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केल्याने, बाजार समितीमधील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे कामाचे दर वाढवून देण्यासंदर्भात माथाडी कामगारांच्या प्रश्नावर मंगळवार, २५ फेबु्रवारी रोजी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. पूर्वसूचना न देता कामबंद आंदोलन करून शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असे सांगत कामबंद आंदोलन मागे घेण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांना यावेळी दिले. त्यानुसार माथाडी कामगारांनी २० फेबु्रवारीपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन मंगळवार, २५ फेबु्रवारी रोजी मागे घेतले. माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्याने दुपारी १ वाजतापासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत झाले.पूर्वसूचना न देता कामबंद आंदोलन करून शेतकºयांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन मागे घेण्याचे निर्देश अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांना दिले. त्यानुसार त्यांनी मंगळवारी दुपारपासून कामबंद आंदोलन मागे घेतले.- डॉ. प्रवीण लोखंडेजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्याने, मंगळवारी दुपारी १ वाजतापासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत.-शिरीश धोत्रेसभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.