लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोपचार रुग्णालयासमोर असलेल्या यमुना तरंग अपार्टमेंटमधील उमा राठी यांना बेशुद्ध करून त्यांच्याकडील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणार्या नोकरास सिटी कोतवाली पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनातील पथकाने ही कारवाई केली असून, आरोपीकडून तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सर्वोपचार रुग्णालयासमोरील यमुना संकुल अपार्टमेंटमध्ये नरेंद्र राठी व त्यांची पत्नी उमा राठी रहिवासी आहेत. त्यांचे दुकान असून, तेथे तीन ते चार नोकर काम करतात. त्यापैकी मो. समीर मो. तस्लीम हा युवकही कामाला होता. त्याने राठी यांना चार दिवसाआधी २५ हजार रुपये मागितले होते; परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे नोकर समीर त्यांच्या दुकानात कामावर येत नव्हता. त्याने बुधवार १७ जानेवारी रोजी सायंकाळी मालक नरेंद्र राठी यांचे घर गाठले. मालकाने पपई पाठविली असल्याचे सांगून मालकीणकडे ती पपई दिली. उमा राठी पपई घेऊन पाठीमागे वळताच त्याने मालकीणला बेशुद्ध करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व कपाटात ठेवलेले ४0 हजार रुपये रोख, असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. या घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनीही त्यांच्या पथकासह धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी समीरसोबत काम करणार्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते; मात्र त्यांना या प्रकाराची माहिती नसल्याने पोलिसांनी समीरच्या गावचा शोध सुरू केला. यावरून मो. समीर मो. तस्लीम हा दिल्लीत असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनातील पथकाचे पीएसआय अमित डहारे, यशोधन जंजाळ, अभय बावस्कर यांनी दिल्ली येथून आरोपीस अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार अनिल जुमळे व पथकाने केली.
अकोला : मालकीणीला बेशुद्ध करून मुद्देमाल पळविणारा जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:37 PM
अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सवरेपचार रुग्णालयासमोर असलेल्या यमुना तरंग अपार्टमेंटमधील उमा राठी यांना बेशुद्ध करून त्यांच्याकडील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणार्या नोकरास सिटी कोतवाली पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली.
ठळक मुद्देसिटी कोतवाली पोलिसांची कारवाईआरोपीस मुद्देमालासह दिल्लीतून अटक