शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Akola: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर अॅट्रासिटीचा गुन्हा, जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या कक्षात घडला प्रकार

By आशीष गावंडे | Updated: July 13, 2024 19:55 IST

Akola News: अकाेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या दालनात शिवसेनेचे (ठाकरे गट)जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार एका महिला सरपंचने सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात दिली.

- आशिष गावंडे अकाेला - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या दालनात शिवसेनेचे (ठाकरे गट)जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार एका महिला सरपंचने सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी पाेलिसांनी जिल्हाप्रमुख दातकर यांच्या विराेधात अॅट्रासिटीचा गुन्हा केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेच्या दहिहांडा सर्कलमध्ये घरकुलसाठी पात्र असलेल्या ओबीसी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याच्या मुद्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेता गाेपाल दातकर यांनी ११ जुलै राेजी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या दालनात उपमुख्यकार्यकारी अधिकारी परिहार, गटविकास अधिकारी रुद्रकार,हिंगणी बु.गावच्या ग्रामसेविका राेशनी माेरे यांना चर्चेसाठी बाेलावले हाेते. यावेळी ग्राम हिंगणी बु.येथील अनेक महिला व पुरुषही उपस्थित हाेते. बैठक सुरु हाेण्यापूर्वी जि.प.‘सीइओ’कामानिमीत्त बाहेर निघून गेल्या. यादरम्यान, ‘सीइओं’च्या कक्षात महिला सरपंच दाखल झाल्या. गाेपाल दातकर घरकुलाच्या मुद्यावर अधिकाऱ्यांसाेबत चर्चा करीत असताना महिला सरपंच व दातकर यांच्यात शाब्दीक वाद झाल्याची माहिती आहे. १२ जुलै राेजी संबंधित महिला सरपंच यांनी सिटी काेतवाली पाेलिस स्टेशन गाठत गाेपाल दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार नाेंदवली. याप्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसांनी दातकर यांच्या विराेधात १३ जुलै राेजी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम २९६, ३५२, ३५१(३), ३(१)(आर),अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३(१)(एस),३(२)(व्हीए)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  जिल्हा परिषद सर्कलमधील प्रलंबित घरकुलाच्या मुद्यावर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक सुरु हाेती. बैठकीचे निमंत्रण नसताना महिला सरपंच आतमध्ये आल्या व अधिकाऱ्यांच्या समक्ष माझ्याशी वाद घातला. त्यांनी दिलेल्या तक्रारीची पाेलिसांनी शहानिशा करावी,ही अपेक्षा आहे.- गाेपाल दातकर, जि.प.गटनेता तथा जिल्हाप्रमुख सेना

टॅग्स :AkolaअकोलाAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा