लोकमत न्यूज नेवटर्कमहान : अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. तसेच यावर्षी सिंचनासाठीही पाणी मिळाले नाही.
या वर्षी महान धरणाच्या परिसरात अल्प पाऊस झाल्याने १ जून ते १५ ऑ क्टोबरदरम्यान धरणाचा जलसाठा केवळ २१.३१ पर्यंत पोहोचला होता. ११ डिसेंबर रोजी धरणात ३४0.४७ मीटर, १५.५0५ द.ल. घ. मीटर १६.७९ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हाच जलसाठा ३४६.८५ मीटर, ७२.६३२ द.ल.घ. मीटर व ८४.११ एवढा जलसाठा होता. या तुलनेत महान धरणात यावर्षी एकूण ६७ टक्के जलसाठा कमी आहे. अल्प जलसाठय़ामुळे धरणातील काही ठिकाणच्या टेकड्या उघड्या पडल्या आहेत. तर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडणे बंद केले असल्यामुळे महान काटेपूर्णा नदी पात्र कोरडे पडले आहे.
तिसरा व्हॉल्व्ह उघडा पडण्याच्या मार्गावरअकोला शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. यापैकी दोन व्हॉल्व्ह आधीच उघडे पडले असून, तिसरा व्हॉल्व्हही उघडा पडण्याच्या मार्गावर आहे. या व्हॉल्व्हवर केवळ एक ते दीड फुटापर्यंत पाणी आहे. पाटबंधारे विभाग बोरगाव मंजूचे सहायक अभियंता अभिजित नितनवरे यांनी धरणातील पाण्याची परिस्थिती बघता मत्स्य बीज केंद्र जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाण्याचे व्यवस्थित व काटकसरीने नियोजन करण्याचे निर्देश दिले.
शेतकर्यांचा पाणी उपसा बंदधरणातील पाणी पातळी बघता जलसाठा अकोला शहराला राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील व नदीमधील पाण्याचा उपसा होऊ नये, याकरिता धरणा तील परवानाधारक शेतकर्यांचे तसेच महान धरण ते उन्नई बंधारादरम्यान परवानाधारक शेतकर्यांचे मोटार पंपाचे वीज कनेक्शन ऑगस्ट महिन्यातच का पण्यात आले. त्यामुळे, यावर्षी शेतकर्यांना रब्बी व उन्हाळी हंगामापासून वंचित राहावे लागले आहे. पाण्याचा उपसा कोणी करू नये, याकरिता वेळोवेळी महान पाटबंधारे विभागाचे कर्मचारी पाहणी करीत आहेत. महान धरणाच्या जलसाठय़ाकडे सहायक अभियंता अभिजित नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता सैयद जानोरकार, पाठक, पिंपळकर, शिराळे, हातोलकर, अजीज खरात, अकबर शहा, झलके हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत.