शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अकोला : जळालेल्या ‘त्या’ महिलेचा खूनच; मृतक महिला यवतमाळची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 2:17 AM

अकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, ही महिला यवतमाळ येथील असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देअज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, ही महिला यवतमाळ येथील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी यवतमाळ आणि अकोल्यातील अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यवतमाळ येथील वैभव नगर राजगुरू अपार्टमेंटमधील रहिवासी   सुमन रामभाऊ लक्षणे (वय ६0) अशी या महिलेची ओळख असून, ही महिला १७ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या महिलेची हत्या करून अज्ञात आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा देह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.महिलेच्या जळालेला मृतदेहाच्या प्रकरणात रामदास पेठ पोलीस सर्वच दिशांनी तपास करीत असतानाच यवतमाळ येथील  वाघापूर वैभव नगर राजगुरू अपार्टमेंटमधील रघुनाथ रामभाऊ लक्षणे यांनी आई बेपत्ता असल्याची तक्रार यवतमाळ येथे दाखल केली आहे.  या  तक्रारीमुळे  अकोल्यात आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाला तोंड फुटले आहे. 

 रघुनाथ लक्षणे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ते आपली  पत्नी तसेच मुलासोबत वेगळे राहत होते. त्यांची आई  सुमन रामभाऊ लक्षणे, भाची  पायल मनोज तोंडसे व पत्नीच्या बहिणीची मुलगी प्रियंका पटेल यांच्यासोबत यवतमाळ येथील संकट मोचन रोडवरील नवीन उमरसरा येथे राहतात. १६ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता रघुनाथ आईला भेटून घरी आला होते. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी त्याची भाची पायलने फोन करून  सुमनबाई या १७ डिसेंबरच्या दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या त्या परत आल्या  नाहीत, अशी माहिती दिली. या नंतर सर्वांनी सुमनबाईंचा शोध घेतला. नातेवाईकांकडेही शोध घेतल्यावर तिचा शोध न लागल्याने अखेर  वडगाव पोलीस स्टेशनमध्ये सुमनबाई  बेपत्ता झाल्याची तक्रारी दाखल करण्यात आली. या दरम्यान यवतमाळचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर हे तपास करीत असताना त्यांना अकोला येथे महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी रघुनाथ  यांना फोन करून, या संदर्भात माहिती दिली. सदर मृतदेह हा सुमनबाईंचा तर नाही ना? या संशयावरून त्यांनी अकोला गाठले. पीएसआय  संतोष मनवर व पोलिस कर्मचार्‍यांच्यासोबत रघुनाथ अकोल्यात आले. रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची माहिती घेतली असता सदर महिला सुमनबाई असल्याची ओळख पटली  आहे.  यावरून रघुनाथ यांनी रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादंवी कलम ३0२, २0१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या  प्रकरणात आरोपी हे यवतमाळमधील असल्याची शक्यता असून त्यांना अकोल्यातील कोणाची मदत मिळाली या दृष्टीने तपास केला जात आहे.

सखोल तपासानंतर उलगडणार हत्येचे गूढ या महिलेला कोठे जाळण्यात आले, अकोल्यातील दगडी पुलाखाली कुणी आणले, यामध्ये कोण-कोण सहभागी आहे, हत्येचा उद्देश काय? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनCrimeगुन्हा