संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण कृषी विभागामार्फत प्राप्त नसल्याने, ‘नाफेड’ मार्फत हरभरा खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. सरासरी उत्पादकतेच्या आधारे एकरी हरभरा खरेदीचे प्रमाण प्राप्त झाले नसल्याने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात हरभरा खरेदी अडकली आहे. नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली नसल्याने, बाजारात मिळणाºया कमी दरात हरभरा विकण्याची वेळ जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकºयांवर आली आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत प्रतिक्विंटल ४ हजार हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी सुरू करण्यात आली आहे; परंतु नाफेडमार्फत हरभरा खरेदीत शेतकºयांकडून एकरी किती हरभरा खरेदी करावी, यासंदर्भात हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण शासनाच्या कृषी विभागामार्फत अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे नाफेडमार्फत हरभरा खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या कापणीनंतर, तयार करण्यात आलेला हरभरा शेतकºयांच्या घरात आला आहे. महिन्याचा कालावधीत उलटून गेला; मात्र नाफेडमार्फत हरभरा खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे बाजारात मिळणाºया कमी दरात हरभरा विकण्याची वेळ जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण कृषी विभागामार्फत केव्हा प्राप्त होणार आणि नाफेडमार्फत आधारभूत किंमत दराने हरभरा खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उत्पादकता प्रमाणाची प्रतीक्षा!हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण प्राप्त झाल्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयार्फत जिल्ह्यात नाफेडमार्फत हरभरा खरेदीसाठी सहा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकºयांकडून एकरी किती हरभरा खरेदी करावी, यासंदर्भात हरभरा उत्पादकतेच्या एकरी प्रमाणाची प्रतीक्षा केली जात आहे.
तूर खरेदी केंद्रांवरच होणार हरभरा खरेदी!नाफेडमार्फत जिल्ह्यात अकोला, तेल्हारा, पिंजर, पातूर, वाडेगाव व पारस या सहा खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. उत्पादकतेचे एकरी प्रमाण प्राप्त झाल्यानंतर तूर खरेदीच्या केंद्रांवरच हरभरा खरेदी सुरू करण्यात येणार आहे.
कृषी विभागामार्फत हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ‘नाफेड’ मार्फत हरभरा खरेदीसाठी सहा खरेदी सुरू करण्यात येतील. तूर खरेदी केंद्रांवरच हरभरा खरेदी सुरू करण्यात येणार आहे.- राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी