- संतोष येलकरअकोला - मार्केटमध्ये सोयाबीन कमी दराने खरेदी करण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात तातडीने खरेदी केंद्रे सुरु करून हमी दराने सोयाबीन खरेदी करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी करण्यात आली.
शेतक-यांच्या घरामध्ये आलेले सोयाबीन मार्केटमध्ये हमीभावापेक्षा कमी कमी दराने खरेदी करण्यात येत आहे.त्यामुळे सरकाराने शेतक-यांच्या पाठीशी उभे राहून तात्काळ खरेदी केंद्र सुरू करून सोयाबीन हमी दराने खरेदी करण्यात यावे, अशी मागणी करीत,तीन दिवसाच्या आत खरेदी केंद्र सुरू न केल्यास वंचित बहुजन आघाडी शेतक-यांच्या सोयाबीनला हमी भाव मिळण्यासाठी रत्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्यावतीने निवेदनातून देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, सदस्य पुष्पा इंगळे, जिल्हा परिषद सभापती आम्रपाली खंडारे, सभापती माया नाईक, सभापती रिजवाना परवीन, ॲड. संतोष राहाटे, महानगर महासचिव गजानन गवई, जि. प. सदस्य राम गव्हाणकर, दिनकरराव खंडारे, सहजिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, नितीन सपकाळ, गजानन दांडगे, संजय किर्तक, महानगर अध्यक्ष कलिम खान पठाण, डॉ. शंकरराव राजुस्कर, मोहन तायडे, देवानंद तायडे, रंजित वाघ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.