अकोला: कोरोना संसगार्च्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या विवाह व मांगलिक कार्यक्रमांच्या सेवा सुरु करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी अकोल्यातील विवाह संघर्ष समितीच्यावतीने तीन दिवसीय साखळी धरणे आंदोलन सोमवारपासून जिल्हाधिकारी कायार्लयासमोर सुरु करण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे गत सहा महिन्यांपासून विवाह व मांगलिक कार्यक्रमांच्या सेवा बंद असल्याने, या सेवांमधील व्यावसायिक आणि कामगार संकटात सापडले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिक व कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनलांकच्या पाचव्या टप्प्यात शासन हळूहळू सर्व क्षेत्रातील सेवा सुरु करीत आहे; मात्र विवाह व मांगलिक कार्यक्रमांच्या सेवा सुरु करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे विवाह व मांगलिक कार्यक्रमांच्या सेवा सुरु करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी विवाह संघर्ष समितीच्यावतीने सोमवार, १२ आक्टोबरपासून तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी (सोमवारी) अकोला टेंट असोसिएशन, मंगल कार्यालय, लांन असोसिएशन, पुरोहित संघ, फ्लावर डेकोरेशन असोसिएशनने धरणे आंदोलनात सहभाग घेतला. १३ आक्टोबर रोजी इव्हेंट, केटरींग, साउंड व लाईट, वेंडींग पत्रिका असोसिएशन आणि १४ आक्टोबर रोजी फोटोग्राफर, घोडी व वाद्य असोसिएशन धरणे आंदोलनात सहभागी होणार आहे. या तीन दिवसीय धरणे आंदोलनात विवाह संघर्ष समितीचे दादासाहेब उजवणे, संजय शर्मा, हेमंत शाह, निखिलेश मालपाणी, दर्शन गोयनका, कृष्णा राठी, संदीप निकम, सुरेंद्र नायसे, सुनिल कोरडीया, गुड्डू पठाण, शिवकुमार शर्मा, गजानन दांडगे, किरण शाह, योगेश कलंत्री, संदीप देशमुख, मंगेश गिते आदी सहभागी झाले आहेत.
विवाह संघर्ष समितीचे साखळी धरणे आंदोलन सुरु!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 7:32 PM