शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

Akola: चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कल पोटनिवडणूक; १७ डिसेंबरला मतदान

By रवी दामोदर | Published: November 22, 2023 6:47 PM

Akola News: अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे.

- रवी दामोदर अकोला - अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे.

कार्यक्रमानुसार, दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पासून करण्यात येईल व छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येण्यात येईल. नामनिर्देशनपत्राचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिका-याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर आहे.

जिल्हा न्यायाधीशांनी अपीलावर सुनावणी व निकाल देण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर आहे.अपील नसलेल्या ठिकाणी दि. ११ डिसेंबर रोजी, तर अपील असलेल्या ठिकाणी दि. १३ डिसेंबर रोजी दु. ३ वा. पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी व निशाणी वाटप अपील नसलेल्या ठिकाणी दि. ११ डिसेंबर रोजी व अपील असलेल्या ठिकाणी दि. १३ डिसेंबर रोजी दु. ३.३० नंतर होईल. मतदान केंद्राची यादी दि. १३ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. मतदान दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान आणि मतमोजणी दि. १८ डिसेंबरला सकाळी १० वा. पासून होईल. निवडून आलेल्या सदस्यांचे नाव २१ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आचार संहिता लागूनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत सदर क्षेत्रात आचारसंहिता अंमलात राहणार आहे. ऐन थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक