शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

अकोला : महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पदाधिकार्‍यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 1:34 AM

अकोला : महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या अकोला विभागीय अध्यक्षपदी उदय गंगाखेडकर, तर सचिवपदी रूपम वाघमारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. २६ जानेवारी रोजी अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवनातील सभागृहात झालेल्या सभेत ही निवड झाली. संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंतराव ताटे, प्रादेशिक सचिव अविनाश जहागीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी कैलास नांदूरकर होते.

ठळक मुद्देकर्मचारी पुन्हा संपावर जाणार : हनुमंत ताटे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या अकोला विभागीय अध्यक्षपदी उदय गंगाखेडकर, तर सचिवपदी रूपम वाघमारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. २६ जानेवारी रोजी अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवनातील सभागृहात झालेल्या सभेत ही निवड झाली. संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंतराव ताटे, प्रादेशिक सचिव अविनाश जहागीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी कैलास नांदूरकर होते.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ फाटक  यांच्या प्रतिमेला हारार्पण करून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तत्कालीन कोषाध्यक्ष गंगाखेडकर यांनी मागील वर्षीचा हिशेब सादर केला. त्यास देवानंद पाठक यांनी मंजुरी दिली. त्यानंतर एकमताने अध्यक्ष व सचिवांची निवड करण्यात आली. दरम्यान, वार्षिक सभेत प्रादेशिक सचिव अविनाश जहागीरदार यांचा मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. संघटनेचे कें द्रीय अध्यक्ष संदीप  शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे यांच्या हस्ते मानपत्र दिले गेले. दरम्यान, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या या सभेत, एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार असल्याचे जाहीर केले. दिवाळीच्या वेळी चार दिवस कामगार संपावर गेले असताना उच्चस्तरीय समिती गठित करून दिशाभूल करण्यात आली. उच्चस्तरीय समितीने १0७६ कोटींचा प्रस्ताव देण्याऐवजी  ७४१ कोटींचा प्रस्ताव सादर केल्याने घोर निराशा झाली  आहे. त्यामुळे समितीच्या अहवालाची होळी करण्यात आली. आता कृती समितीच्यावतीने लवकरच आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. विभागीय कार्यालयासाठी मंगेश बोर्डे, गणेश डांगे, विलास बोधनकर, दत्ता सहारे, राजीक देशमुख, सचिन हाताळकर, रहीम खान, अभिनय पांडे,  श्रीकृष्ण तराळे, प्रभुदास तळोकार, दत्तात्रय इंगळे, दिनकर डवरे, गजानन तिडके, संजय भिवरकर, पृथ्वीराज चव्हाण, देवकुमार खिराडे, नारायण शेळके, मुकेश शिकवाल, विजय गवई, नरेश मुराई, जे.ए. राऊत, संतोष घोगरे यांची निवड करण्यात आली. सभेचे संचालन दीपक वैष्णव यांनी केले. आभार गणेश डांगे यांनी मानले. सभेच्या यशस्वितेसाठी श्याम दुबे, अभिनय पांडे, सुधीर महाजन, प्रवीण जयस्वाल, जयवंत देशमुख, जाफरभाई, अरूण माहुदे, प्रमोद दंडगव्हाळ, संजय वैद्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळAkola cityअकोला शहर