अकोला : जिल्हय़ात अधून-मधून पाऊस सुरू असून, ३ जुलै रोजी अकोला शहर व परिसरात सकाळी ८.३0 ते सायंकाळ ५.३0 पर्यंत १८.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. तर पिकांना हे पाणी अत्यंत पोषक ठरत आहे. जिल्हय़ात यावर्षी उशिरा पावसाने सुरुवात केली आहे; परंतु मागील आठवड्यापासून अधून-मधून पाऊस कोसळत असल्याने पिकांना तर पोषक ठरलाच पण अनेक शहराच्या लगत सतत कोसळत असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. या परिसरात पाऊस चांगला होत असल्याने शेतकर्यांनी सोयाबीन, कापूस, तूर या पिकासह मूग व उडीद पेरणी केली आहे. दरम्यान नागपूर वेदशाळेने विदर्भात सरासरी पाऊस झाल्याची नोंद केली आहे.
अकोला शहरात १८ मि.मी. पावसाची नोंद!
By admin | Published: July 04, 2016 1:40 AM