अकोला, दि. २५- लहान उमरी येथील एका युवकाने तर खेडकर नगरमधील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघटकीस आली. लहान उमरी येथील रहिवासी एका युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. आकाश प्रकाश पारधी असे युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. तसेच खेडकरनगर परिसरातील रॉयल पॅलेसमधील रहिवासी महिलेने स्नानगृहातील शॉवरला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान उघड झाली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. माधुरी कोल्ड्रिंकजवळील रहिवासी वडतकर नामक महिलेने आज दुपारी घरात शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी रात्री उघड झाला. पोलिसांना माहीत होताच त्यांनी घटनास्थळ गाठले व प्रेताचा पंचनामा केला.
अकोला शहरात दोन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2016 3:16 AM