अकोला: जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पदाचा प्रभार उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्याकडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा प्रभार उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्याकडे देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा कोरोना चाचणी अहवाल १४ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बुधवार, १९ जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी रजेवर असल्याने सोमवार व मंगळवार असे दोन दिवस जिल्हाधिकारी पदाचा प्रभार उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने ते २२ जानेवारीपर्यंत रजेवर आहेत. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा प्रभार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विश्वनाथ घुगे यांच्याकडे देण्यात आला आहे.