अकोला : देशात एकता, समता व बंधुता राहावी यासाठी अल्पसंख्याक समुदाय तसेच बहुसंख्याक समुदाय यांनी आपले संबंध दुधातील साखरेप्रमाणे एकसंघ राखावे,असे प्रतिपादन महसुलचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश आहे.या निदेर्शानुसार या दिवसाच्या निमित्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून उपजिल्हाधिकारी महसूल राजेश खवले हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे हे होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी रोहयो अशोक अमानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. धर्म व भाषा यावर आधारीत अल्पसंख्याक समाज आहे. धर्म व भाषेनुसार यात भेदाभेद न करता सर्वांनी एकसंघ होवून कार्यरत राहावे. देशात अखंडीतता राखण्यासाठी परंपरा , संस्कृती, भाषा व धर्म एका समुदायाने दुस-या समुदायावर लादु नये. घटना व कायादयानुसार प्रत्येकाला आपला हक्क दिलेला आहे. प्रत्येकाला स्वातंत्र आहे असे श्री. खवले यांनी वेगवेगळे उदाहरण देवून उपस्थितांना समजावून सांगितले. अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते. असे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा खणीकर्म अधिकारी अतुल दौड यांनी केले. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 6:50 PM
अकोला : अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश आहे.या निदेर्शानुसार या दिवसाच्या निमित्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्दे लोकशाही सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.धर्म व भाषेनुसार यात भेदाभेद न करता सर्वांनी एकसंघ होवून कार्यरत राहावे. - उपजिल्हाधिकारी राजेश खवलेअल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते.