लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काळीपिवळी प्रवासी वाहनाने महानकडे जात असलेल्या किराणा व्यावसायिकांकडून ५ लाख २0 हजार रुपयांची रोकड लुटमार प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरीचा आरोप असलेल्यांनाच परत देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने सोमवारी दिले. या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून, या संदर्भात पोलीस अधीक्षकांना न्यायालयाने लेखी पत्र दिल्याची माहिती आहे.महानचे किराणा व्यावसायिक शंकर माणिकराव सरोदे हे अकोल्याकडे काळीपिवळीने किराणा साहित्य खरेदीसाठी येत होते. महानपासून तीन किलोमीटर अंतरावर काही आरोपींनी २२ जुलै २0१५ रोजी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख २0 हजार रुपयांची रक्कम पळविली होती. या प्रकरणी शंकर सरोदे यांनी बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक एस. जी. कोरचे यांनी तपास करीत शेख यासीन शेख निसार, सूरज जयंतीलाल मोखकर, रोशन रामनारायण बामन, सैयद अबरार सैयद अंसार, हमीद बी शेख निसार, शेख मेहबूब ऊर्फ दौला यांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ७५ हजार रुपये जप्त केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींविरोधातील गुन्हा सिद्ध झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपींकडून जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम त्यांनाच परत करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास प्रचंड घोळ घालणारा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तपासावर चांगलेच ताशेरे ओढले.
अकोला : जप्त केलेली रक्कम परत करण्याचा न्यायालयाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:16 AM
अकोला : काळीपिवळी प्रवासी वाहनाने महानकडे जात असलेल्या किराणा व्यावसायिकांकडून ५ लाख २0 हजार रुपयांची रोकड लुटमार प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरीचा आरोप असलेल्यांनाच परत देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने सोमवारी दिले. या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून, या संदर्भात पोलीस अधीक्षकांना न्यायालयाने लेखी पत्र दिल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देलुटमार प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरीचा आरोप असलेल्यांनाच परत देण्याचा आदेशपोलिसांच्या तपासावर न्यायालयाने ओढले ताशेरे