शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

Akola: चार लाखांची बॅग लंपास करणाऱ्या गुन्हेगारास ठाेकल्या बेड्या 

By आशीष गावंडे | Published: October 01, 2024 9:38 PM

Akola News: राष्ट्रीय महामार्गालगतच्या लाेणी राेडवरील नवीन किराणा मार्केट मधून एका चारचाकी वाहनाला अडकवलेली चार लाखांची बॅग दाेन अज्ञात चाेरट्यांनी सिने स्टाइल लंपास केल्याची घटना १२ फेब्रुवारी २०२४ राेजी घडली हाेती.

- आशिष गावंडे अकोला -  राष्ट्रीय महामार्गालगतच्या लाेणी राेडवरील नवीन किराणा मार्केट मधून एका चारचाकी वाहनाला अडकवलेली चार लाखांची बॅग दाेन अज्ञात चाेरट्यांनी सिने स्टाइल लंपास केल्याची घटना १२ फेब्रुवारी २०२४ राेजी घडली हाेती. याप्रकरणी जुने शहर पाेलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्याकडे साेपविल्यानंतर आठ महिन्यानंतर ‘एलसीबी’च्या चमुने सराइत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड येथून शिताफीने अटक केली.

आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपुत (३२ रा. विद्या नगर, झोपडपट्टी आयशा मस्जीद मागे चिंचवड, पुणे)असे अटक करण्यात आलेल्या सराइत व कुख्यात आराेपीचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या नवीन किराणा मार्केटमध्ये १२ फेब्रुवारी राेजी फिर्यादी शुभम संजय बेहरे किराणा साहित्य खरेदीसाठी आले हाेते. त्यांच्याकडील चार लाख रूपयांची बॅग टाटा एस गाडीला मागील बाजूने अडकवलेली होती. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी बॅग घेऊन पळ काढला. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरूध्द भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. बॅग लंपास करण्यात पटाइतशहरात जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत रामदास पेठ, सिव्हील लाईन, सिटी कोतवाली व जुने शहर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत चार ठिकाणी बॅग लंपास व चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. गुन्हेगारांची कार्यशैली लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके यांना तपास करण्याचे निर्देश दिले. तपासाअंती आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपुत हा सराइत गुन्हेगार असून ताे बॅग लंपास करण्यात पटाइत असल्याचे निष्पन्न झाले.  सुगावा लागला पण...तपास पथकातील ‘पीएसआय’गोपाल जाधव, माजीद पठाण, अंमलदार अब्दुल माजीद, वसीमोद्दीन शेख, रविंद्र खंडारे, अविनाश पाचपोर, भास्कर धोत्रे यांना काही महिन्यांपूर्वीच आराेपीचा सुगावा लागला हाेता. परंतु आराेपी राजपूत हा पुणे जिल्ह्यातूनही तडीपार असल्याने त्याचा नेमका ठावठिकाणी सापडत नव्हता. अखेर आठ महिन्यानंतर त्याला राहत्या घरुन शिताफीने अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचे इतर दाेन साथीदार फरार असून त्यांचा शाेध घेतला जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी