लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. त्यानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ३० हजार शेतकºयांना दोन हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.कोणत्याही अटी-शर्थीविना राज्यातील शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २१ डिसेंबर रोजी केली. त्यानुसार ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, येत्या मार्चपासून कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. अकोला जिल्ह्यात २०१६ ते २०१९ या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांपैकी २ लाख ३० हजार शेतकºयांचे कर्ज थकीत आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांसाठी जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ३० हजार शेतकºयांचे २ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे.अडीच वर्षांपूर्वीच्या कर्जमाफीत १.३२ लाख शेतकºयांना लाभ!अडीच वर्षांपूर्वी २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३० जून २०१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. या कर्जमाफी योजनेत शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यात १ लाख ९९ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ४५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी गत अडीच वर्षांत १ लाख ३२ हजार शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला.
जिल्ह्यात २ लाख ३० हजार शेतकरी थकबाकीदार असून, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनुसार जिल्ह्यातील शेतकºयांना जवळपास २ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.- डॉ. प्रवीण लोखंडेजिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था)अकोला