- संतोष येलकर
अकोला : पावसाळा सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी उरला आहे. त्यानुषंगाने खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना, २ मे पर्यंत गत महिनाभरात जिल्ह्यात केवळ १० हजार ७८१ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ५९ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात पीक पेरणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व ग्रामीण बँकमार्फत जिल्ह्यातील तीन लाख खातेदार शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार गत १ एप्रिलपासून अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू करण्यात आली. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उटला; मात्र उद्दिष्टाच्या तुलनेत २ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ १० हजार ७८१ शेतकºयांना १०० कोटी ९९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी उरला असून, खरीप पिकांच्या पेरण्या तोंडावर आल्या असताना, गत महिनाभरात जिल्ह्यात केवळ १० हजार ७८१ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यंदाच्या खरीप हंगामात पीक पेरणीपूर्वी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाची माहितीच नाही!पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया १ एप्रिलपासून जिल्ह्यात बँकांमार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये २ मे पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत १० हजार ७८१ शेतकºयांना १०० कोटी ९९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. परंतु, गत महिनाभरात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व ग्रामीण बँकमार्फत पीक कर्ज वाटपाची माहिती २ मे पर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आली नाही. या बँकांच्या पीक कर्ज वाटपाची माहितीच अद्याप उपलब्ध नाही.
बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचे असे आहे उद्दिष्टबँका रक्कम (लाखांत)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ६८३९८ . ००राष्ट्रीयीकृत बँका ५२७७८ . ००खासगी बँका ४७१३ . ००ग्रामीण बँक ७५७० .००................................................................................एकूण १३३४५९ . ००