अकोला: शेतकरी सेवेच्या ११० व्या वर्षात पदार्पण करीत असताना अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीची भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक म्हणुन निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरिल ‘इनमा’ या आर्थिक सर्वेक्षण संस्थेने बँको राष्ट्रीय पुरस्कार देऊन या बँकेला सन्मानित केले आहे.हैदराबाद येथे झालेल्या शानदार समारंभात तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मो.महेमुद अली, आय.डी. आर. बी. टी. चे संचालक डॉ. ए. एस. रामाशास्त्री तसेच एन. ए. एफ. सी. यू. बी. नवी दिल्ली चे संचालक रमेश कुमार बंग यांच्या हस्ते बँको पुरस्कार अकोला जिल्हा बँकेसस प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे वतीने जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य, कर्जे व देखरेख विभागाचे व्यवस्थापक प्रभुदास शेंडे व हिशेब व बँकिंग विभागाचे व्यवस्थापक शिवप्रसाद मोहोड यांनी हा पुरस्कार स्विकारला. इनमा या राष्ट्रीय आर्थिक संथेने सर्वेक्षण १० ज्युरी च्या मार्गदर्शनात देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकरंवर सर्वांगीण अभ्यास करुन बँको पुरस्काराकरीता अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून निवड केली.
हा सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान - डॉ. संतोषकुमार कोरपेया पुरस्कारा बाबत बोलतान अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ . संतोषकुमार कोरपे म्हणाले, की अकोला व वाशीम जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर, ग्राहक, ठेवीदार, भागदारक व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळेच बँक सातत्याने प्रगती पथावर आहे. लोकांचा विश्वास हाच सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. मात्र देशभरातील जिल्हा बँकेचा अभ्यास करुन जेव्हा ही बँक सर्वोत्तम ठरते तेव्हा बँकेचे संचालक मंडळ किंवा कर्मचाºयांचाच हा सन्मान नसतो तर तो अकोला व वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान असतो. अकोला व वाशीम जिल्ह्यातील जनतेच्या विश्वासावर बँक प्रगतिपथावर राहिल असा विश्वास डॉ . कोरपे यांनी व्यक्त केला.