लोकमत न्यूज नेटवर्कअलेगाव (अकोला): चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चरणगाव येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून महिनाभरापूर्वी गावातीलच एका तरुणाने पळविले होते. या प्रेमी युगुलास चान्नी पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चरणगाव येथील एका अल्पवयीन मुलीस गावातीलच सूरज इंगळे याने फूस लावून महिनाभरापूर्वी पळवून नेले होते. या प्रेमी युगुलाचा चान्नी पोलीस शोध घेत होते. मोबाइल डाटा आणि गुप्त माहितीवरून चान्नी पोलिसांना हे प्रेमी युगुल औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे चान्नी पोलिसांनी प्रेमी युगुलाला औरंगाबाद जिल्ह्यातील पेढेगाव येथून ताब्यात घेतले. युवतीला तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सूरज इंगळे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६, पॉस्को ३, ४, कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पालक मंत्र्यांक डेही तक्रार केली होती.
अकोला जिल्हय़ातील चरणगावचे प्रेमी युगुल पकडले औरंगाबादेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 11:38 PM
अलेगाव (अकोला): चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चरणगाव येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून महिनाभरापूर्वी गावातीलच एका तरुणाने पळविले होते. या प्रेमी युगुलास चान्नी पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देगावातीलच एका तरुणाने महिनाभरापूर्वी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले होतेचान्नी पोलिसांनी युवकाविरुद्ध केला गुन्हा दाखल