लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील सात-बारा तसेच इतर १८ महसूल सेवा प्रमाणपत्र डिजिटल करून, अकोला जिल्हा ‘ई-डिस्ट्रिक’ करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते. महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात चावडी वाचनाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून, सात-बारातील दुरुस्तीकरिता प्राप्त आक्षेपांनुसार दुरुस्तीचे काम येत्या १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यातील महसूल वसुली, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे, मागेल त्याला शेततळे, पीक विमा योजना, पीक कर्जाचे वाटप, सिंचन विहिरी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, पंतप्रधान आवास योजना, महसूल विभागांतर्गत रिक्त पदे, बिंदूनामावली व इमर प्रकारच्या कामांचा आढावा घेत प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी यावेळी दिले. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.सात-बारासह डिजिटल प्रमाणत्रांचे वितरण १५ आॅगस्टपासून!जिल्ह्यात सात-बारा आणि डिजिटल स्वाक्षरीसह १८ प्रकारचे प्रमाणपत्र वितरण येत्या १५ आॅगस्टपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या बैठकीत दिली. सात-बारासह महसूल विभागांतर्गत १८ प्रकारचे प्रमाणपत्रांचे वितरण आॅनलाइन करण्यात येणार असल्याने महसूल सेवा गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख होणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले.कर्जमाफी योजना मदत केंद्राचे उद्घाटन!छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात कर्जमाफी योजना मदत केंद्राचे उद्घाटन विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरून देण्याबाबतचे मार्गदर्शन या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.
अकोला जिल्हा ‘ई-डिस्ट्रिक’ करा!
By ram.deshpande | Published: July 26, 2017 2:43 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील सात-बारा तसेच इतर १८ महसूल सेवा प्रमाणपत्र डिजिटल करून, अकोला जिल्हा ‘ई-डिस्ट्रिक’ करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ...
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांच्या सूचना प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे निर्देश