अकोला: जिल्ह्यातील गाय-म्हैसवर्गीय ३ लाख १४ हजार ८९७ जनावरांना नऊ महिने पुरेल एवढा ४ लाख ९४ हजार १५१ मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात यावर्षीच्या उन्हाळ्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय लहान-मोठी ३ लाख १४ हजार ८९७ जनावरे असून, या जनावरांसाठी दरमहा ५२ हजार ३६३ मेट्रिक टन लागतो. त्यानुसार फेबु्रवारी ते जून अखेरपर्यंत या पाच महिन्यांच्या कालावधीत जनावरांसाठी २ लाख ६१ हजार ८१५ मेट्रिक टन चाºयाची आवश्यकता आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात सध्या ४ लाख ९४ हजार १५१ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. त्यामध्ये मका, ज्वारी, संपूर्ण गवत, कडबा, तूर, सोयाबीन, हरभरा व गव्हाचे कुटार इत्यादी चाºयाचा समावेश आहे. दरमहा लागणारा चारा आणि उपलब्ध चारा लक्षात घेता, जिल्ह्यातील गाय-म्हैसवर्गीय जनावरांना नऊ महिने (आॅक्टोबर अखेरपर्यंत) पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे, असा दावा जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनी केला आहे.जिल्ह्यात गाय-म्हैसवर्गीय अशी आहेत जनावरे!-मोठी जनावरे : २४०१९५-लहान जनावरे : ७४७०२..............................................-एकूण : ३१४८९७
जिल्ह्यातील गाय-म्हैसवर्गीय जनावरांसाठी फेबु्रवारी ते जून अखेरपर्यंत २ लाख ६१ हजार ८१५ मेट्रिक टन चाºयाची आवश्यकता आहे. त्या तुलनेत सध्या जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार १५१ मेट्रिक टन उपलब्ध आहे. उपलब्ध असलेला चारा जिल्ह्यातील जनावरांना नऊ महिने पुरणार आहे. त्यामुळे चाराटंचाई भासण्याची शक्यता नाही.-डॉ. एच. आर. मिश्रा,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.