अकोला : गत दोन ते तीन दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्या हिवाळय़ात प्रथमच हुडहुडी भरणारी थंडी दोन दिवसांपासून अनुभवयास मिळत आहे. रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाली असून पारा १९ अंशसेल्सिअसवरून थेट १४ अंशापर्यंंत खाली आला आहे. दिवसाच्या तापमानातही २ अंशाची घट नोंदविल्या गेली. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी उबदार कापडांच्या उपयोगाला सुरुवात केली असून, शहरातील काही भागात शेकोट्यादेखील पेटविल्या जात आहेत.
अकोला जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला!
By admin | Published: December 07, 2015 2:29 AM