संतोषकुमार गवईशिर्ला (अकोला): हिवाळी अधिवेशनाच्या सूप वाजण्याच्या एक दिवस पुर्वी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार हे अकोला जिल्ह्यातील शिर्ला (ता.पातुर) येथील राष्ट्रीय महामार्गावरील चार मेगावॉट चा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रकल्प तातडीने पाठपुरावा मंजूर करून घेण्यात यशस्वी झाले आहेत.गुरुवारी सकाळी नऊ वाजता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आमदार बळीराम सिरस्कार यांनी पातुर तालुक्यातील शेतकºयांना वीजेच्या तुडवड्यामुळे कृषी पंपावर आधारित सिंचन करण्यासाठी दिवसा वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे बागायती शेती अडचणीत आल्याची माहिती दिली.त्याबरोबरच कृषी पंपासाठी स्वतंत्र कृषी फिडर देण्यासाठीची मागणी केली.तेव्हा पातुर तालुक्यातील शिर्ला येथील चार मेगावॉट चा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर करीत असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्याबरोबरच स्वतंत्र कृषी फिडर साठी अतिरिक्त एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याचे सांगितले.त्याबरोबरच सौर ऊर्जा प्रकल्प निमीर्तीच्यासाठी जलदगतीने सदर प्रकल्प पूर्ण करण्यात येईल असे सांगितलेबाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगितले,की पातुर तालुक्यातील १८००शेतकºयांना रात्रीच्या वेळी थ्रिफेज वीज पुरवठा मिळत होता त्यामुळे शेतक?्यांना रात्रीच्या वेळी शेतीला कृषी पंपाद्वारे सिंचन करणे अतिशय जिकिरीचं झाले होते त्यामुळे दिवसा बाजारपेठ अथवा दैनंदिन जबाबदाºया पार पाडण्यासाठी प्रचंड अडचणी येत होत्या त्यामुळे बाळापूर मतदारसंघातील शेतकरी सातत्याने दिवसभर वीज पूरवठा मिळण्यासाठी माझेकडे मागणी करीत होते.त्यामूळे शेतकºयांची अडचण डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तत्संबधीचा प्रस्ताव मंगळवारी हिवाळी अधिवेशनात सभागृहात सादर केला. त्यासंबंधी ची बैठक गुरुवारी सकाळी नऊ वाजता ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झाली.बाळापुर तालुक्यातील निमकर्दा - टाकळी येथील सौर ऊर्जा प्रकल्प आणि मांडोली-डोंगरगाव ह्या रस्त्याच्या कामांना ऊर्जामंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.पातुर तालुक्यातील शेतकº्यांना त्याबरोबरच ग्रामीण/ शहरी भागातील वीजपुरवठा भारनियमनमुक्त करण्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार ठिकठिकाणी गरजेनुसार सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासनानेकडे पाठपुरावा करणार आहे. -बळीराम सिरस्कार, आमदार बाळापूर विधानसभा मतदारसंघपातूर तालुक्यात आलेगांव येथे ६४ एकर शासकिय जमीन सौर ऊर्जा प्रकल्प साठी उपयुक्त आहे तीचा वापर केल्यास वीजेचा ताण कमी होईल.-डॉ.आर. जी.पुरी, तहसीलदार पातुरदिनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत शासनाला स्वतंत्र कृषी फिडरचा प्रस्ताव दिला आहे.कृषी फीडर लवकर अस्तिवात आल्यानंतर त्याबरोबरच सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मुळे मागणी नूसार वीजपुरवठा करणे शक्य होईल.- संतोष खुमकर, उपविभागीय अधिकारी महावितरण,पातुर