- अनिल गिºहेलोकमत न्यूज नेटवर्कव्याळा: डिजिटल स्वाक्षरी असलेला सात-बारा विविध शासकीय कामांमध्ये वापरण्याची मुभा दिल्यानंतर गत सहा महिन्यांत सात-बारा आॅनलाइन काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गत सहा महिन्यांत राज्यात सर्वाधिक सात-बारा पुणे जिल्ह्यात तर त्यानंतर अकोला जिल्ह्यात डाउनलोड करण्यात आले आहेत.राज्यात सुमारे २ कोटी ५२ लाख सात-बारा असून, त्यापैकी डिजिटल स्वाक्षरी झालेले सात-बारा सुमारे २ कोटी ४० लाख आहेत. डिजिटल स्वाक्षरी असलेले सात-बारा पोर्टल राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने २० सप्टेंबर १९ नागरिकांना खुले केले आहे. त्यामुळे तलाठी यांच्याकडे सात-बारासाठी जाण्याची गरज राहिली नाही. डिजिटल स्वाक्षरी असलेला सात-बारा विविध शासकीय कामासाठी वापरण्याची मुभा दिली असून, हा सातबारा १५ ते २० रुपयांत कुठेही काढता येत आहे. त्यामुळे २० सप्टेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत डिजिटल सात-बारा अकोला जिल्ह्यातील ५५ हजार ९६९ शेतकऱ्यांनी काढला आहे.तिसºया क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे. या सात-बारावरील फेरफार लवकर घेत अपलोड केल्यास शेतकºयांसाठी आणखी सोयीचे होईल. काही तलाठी मुद्दामहून फेरफार घेण्यास दिरंगाई करीत आहेत, तर वारसाचा फेरफार घेण्यास उशीर लावत आहे. यासंबंधी शिबिर घेऊन प्रलंबित फेरफारची संख्या कमी होईल. पीक पेरा अद्ययावत केल्यास नागरिकांचा त्रासही कमी होईल तसेच पीक पेरा दिलेल्या वेळेत पूर्ण न करण्यावर कारवाई करावी म्हणजे डिजिटल सात-बारा वापरणाºयांची आणखी संख्या वाढणार आहे.
डिजिटल स्वाक्षरी असलेले सात-बारा सर्व कामांसाठी ग्राह्य धरले जातात. राज्यात सर्वाधिक सात-बारा पुणे जिल्ह्यात डाउनलोड करण्यात आले. दुसºया क्रमांकावर अकोला आहे.
-रामदास जगताप, राज्य समन्वयक