अकोला : बारावीपाठोपाठ दहावीतही अमरावती विभागातील अव्वल स्थान गमाविणार्या अकोला जिल्ह्यातील ८५.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. बाल शिवाजी हायस्कूलच्या यशपाल पाकळ आणि धनंजय सहस्त्रबुद्धेने ९९.४0 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यातून ४२९ शाळांमधील २८४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८४१५ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. त्यापैकी २४३४८ म्हणजे ८५.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १४७१४ मुलांपैकी ८२.७१ टक्के म्हणजे १२१७0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १३७0१ मुलींनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ८८.८८ टक्के म्हणजे १२१७८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. *मुलींमध्ये होलीक्रॉसची प्रणाली प्रथम दहावीच्या परीक्षेत मुलींमधून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रणाली अग्रवालने मिळविला. तिला ९८.६0 टक्के गुण मिळाले. तिच्यापाठोपाठ नोएल कॉन्व्हेंट स्कूलच्या पलक पुरोहितने ९८.४0 टक्के गुण मिळविले आहे.
*विभागातील अव्वल स्थान गमाविलेअमरावती विभागामध्ये गतवर्षी दहावीच्या परीक्षेत अव्वल स्थान मिळविणारा अकोला जिल्हा यावर्षी तिसर्या स्थानावर आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ८0.७५ टक्के गुण मिळविले होते. यावर्षी ८५.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बुलडाणा आणि वाशिमनंतर अकोला जिल्हा विभागात तिसर्या स्थानावर आला आहे. *बाल शिवाजीने पुन्हा मारली बाजी गतवर्षी दहावीच्या निकालात बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी खोडकुंभेने प्रथम येण्याचा मान निमळविला होता. यावर्षी पुन्हा एकदा याच शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी ९९.४0 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. बाल शिवाजी शाळेच्या यशपाल मंगलसिंग पाकळ आणि धनंजय सतीश सहस्त्रबुद्धे या दोघांनीही सर्वाधिक गुण मिळविले.