अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरत्या पूरक नळ योजना व नळ योजना विशेष दुरुस्तीच्या ३२ कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे; मात्र एकाही नळ योजनेचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे टंचाई निवारणाच्या नळ योजनांची कामे कागदावरच असून, रखडलेली नळ योजनांची कामे केव्हा सुरु होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले कोरडी पडली आहेत. त्यामुळे तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाºयांनी मंजूरी दिली आहे. कृती आराखड्यात समाविष्ट गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी प्राप्त प्रस्तावांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. त्यामध्ये ३२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १३ तात्पुरत्या पूरक नळ योजना आणि १९ नळ योजनांची विशेष दुरुस्ती अशा एकूण ३२ नळ योजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. परंतू, प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या ३२ नळ योजनांच्या कामांपैकी एकाही नळ योजनांचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे टंचाई निवारणाच्या नळ योजनांची कामे अद्याप कागदावरच आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील रखडलेल्या तात्पुरत्या पूरक नळ योजना आणि नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या नळ योजनांची कामे कागदावरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 4:18 PM
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरत्या पूरक नळ योजना व नळ योजना विशेष दुरुस्तीच्या ३२ कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे; मात्र एकाही नळ योजनेचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही.
ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणासाठी १३ तात्पुरत्या पूरक नळ योजना आणि १९ नळ योजनांची विशेष दुरुस्ती अशा एकूण ३२ नळ योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या ३२ नळ योजनांच्या कामांपैकी एकाही नळ योजनांचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही. नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.