शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात आता मोफत ‘केमोथेरपी’ची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 2:11 AM

अकोला : कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणार्‍या केमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. साधारणत: जून महिन्यापासून राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार असून, त्यामध्ये अकोल्याच्या स्त्री रुग्णालयाचा समावेश असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

ठळक मुद्देकर्करोगाच्या रुग्णांना दिलासा पहिल्या टप्प्यात राज्यातील १0 जिल्ह्यांचा समावेश 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणार्‍या केमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. साधारणत: जून महिन्यापासून राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार असून, त्यामध्ये अकोल्याच्या स्त्री रुग्णालयाचा समावेश असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात वर्षभरात सुमारे ११ लाख कर्करुग्ण आढळून येतात. देशात जुने आणि नवे मिळून सुमारे २८ लाख कर्करुग्णांची संख्या आहे. त्यापैकी पाच लाख मृत्यू दरवर्षी कर्करोगाने होतात. महाराष्ट्रातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याबाबत राज्य शासनातर्फे उपाययोजना केल्या जातात. उपचारासोबतच प्रतिबंधात्मक आणि जाणीव जागृतीपर मोहीम हाती घेतली जाते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. दिवसेंदिवस कर्करोगाचा वाढता प्रसार पाहता त्याच्या उपचारासाठी आरोग्य विभाग आणि टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयातर्फे आवश्यकतेनुसार सुमारे सहा आठवड्यांचा केमोथेरपी कोर्स रुग्णाला दिला जातो. यासाठी रुग्णाला दर आठवड्याला मुंबईत यावे लागते. त्यांना प्रवासाचा होणारा ताण, आर्थिक ताण ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आता मोफत केमोथेरपीची सुविधा जिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे. या सुविधेमुळे कर्करुग्णांना स्थानिक स्तरावरच उपचार घेता येणे शक्य होणार आहे. 

डॉक्टर व परिचारिकांना पुढील महिन्यात प्रशिक्षण 

  • या सुविधेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या १0 जिल्हय़ांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातील फिजिशन आणि नर्स यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. किमोथेरपी औषध देण्याचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील एक फिजिशन आणि स्टाफ नर्स यांना देण्यात येणार आहे. टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने मेडिकल ऑन्कोलॉजी विभागात तीन आठवड्यांचे हे प्रशिक्षण दिले जाणार असून, मे महिन्यापासून पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयांना फिजिशन आणि नर्स यांची नावे कळविण्यास सांगितली आहेत. 
  • जिल्हा रुग्णालयात केमोथेरेपी युनिट सुरू करण्यासाठी लागणार्‍या औषधांची यादीदेखील टाटा रुग्णालयातून घेण्यात आली आहे. साधारणत: जूनपासून हे युनिट जिल्हा रुग्णालयात सुरू होतील. उर्वरित जिल्हा रुग्णालयात दुसर्‍या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
  • केमोथेरपीचा सहा आठवड्यांचा कोर्स टाटा रुग्णालयाकडून रुग्णांना दिला जातो. पहिल्या आठवड्याचा कोर्स हा टाटा रुग्णालयातच घेतला जातो. आता जिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देणार असल्याने राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना त्यासाठी मुंबईत येण्याची गरज भासणार नाही. यामुळे त्यांचा निवासाचा आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून, रुग्णाला होणारी दगदग कमी होण्यास मदत होणार आहे.

स्त्री रुग्णालयात लवकरच असंसर्गिक रोग विभाग सुरु होणार आहे. यामध्ये कर्करोग तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. तसेच अकोल्यातील संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटलसोबत करार असल्यामुळे कर्करोगांच्या पुरुष रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत केमोथेरेपी करण्यात येईल, याचा लाभ रुग्णांना होणार आहे. - डॉ. राजकुमार चव्हाणजिल्हा शल्यचिकित्सक, अकोला. 

टॅग्स :Akolaअकोलाcancerकर्करोग