- संतोष येलकर
अकोला: तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असताना, मार्च अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण झाली असून, ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात संबंधित यंत्रणा उदासीन असल्याचे वास्तव समोर येत आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले कोरडी पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना दूर अंतरावरून विहीर-हातपंपाचे पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ५४३ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा खर्चदेखील प्रस्तावित करण्यात आला. यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावानुसार कृती आराखड्यात प्रस्तावित कामांपैकी ४३९ कामांना जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांगावांत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, ३१ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २५५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २७९ गावांमध्ये ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात संबंधित यंत्रणांकडून कानाडोळा करण्यात येत असून, पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत कामे!उपाययोजना कामेविंधन विहीर १०६कूपनलिका ८२खासगी विहिरींचे अधिग्रहण ३०टँकरद्वारे पाणीपुरवठा ५५........................................................एकूण २७३२८९ गावांत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार?पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित ५४३ गावांपैकी मार्च अखेरपर्यंत २५५ गावांत २७३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असली तरी, उर्वरित टंचाईग्रस्त २७९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ८११ कामे केव्हा पूर्ण होणार आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.