लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तापडिया नगरातील निखिल भोंडे यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी सुमारे २.५0 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या तापडिया नगरामध्ये इंद्रा निखिल भोंडे कुटुंबीय वास्तव्यास आहे. अपघाताच्या कारणामुळे निखिल भोंडे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गत तीन दिवसांपासून दाखल आहेत. त्यामुळे घरी कुणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूपकोंडा तोडून घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व काही रोख रक्कम लंपास केली. सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्वर शेख हे ताफ्यासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घरातील सोन्याचे मंगळसूत्र, हार, टॉप्स, दागिने असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा माल लंपास केल्याची माहिती त्यांनी दिली. या चोरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अकोला : तापडिया नगरात २.५0 लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:57 AM
अकोला : तापडिया नगरातील निखिल भोंडे यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी सुमारे २.५0 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ठळक मुद्देचोरट्यांनी सुमारे २.५0 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर केला हात साफ सव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे