शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

Akola: १५ वर्षांनंतरही अकोला-पूर्णा ब्रॉडगेज उपेक्षितच, धावताहेत केवळ २३ ट्रेन, विद्युतीकरणही अपूर्ण

By atul.jaiswal | Published: November 22, 2023 6:34 PM

Akola News: दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात सरळ व जवळचा अकोला-पूर्णा लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन गत आठवड्यात १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या मार्गाच्या पदरी उपेक्षाच आल्याचे चित्र आहे.

- अतुल जयस्वाल अकोला - दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात सरळ व जवळचा अकोला-पूर्णा लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन गत आठवड्यात १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या मार्गाच्या पदरी उपेक्षाच आल्याचे चित्र आहे. इतके वर्षे उलटूनही या मार्गावर चार दैनंदिन गाड्यांसह केवळ २३ रेल्वे धावत आहेत. एवढेच नव्हे, तर विद्युतीकरणाचे कामही अजून अपूर्णच आहे.

दक्षीण-मध्य रेल्वेच्या अखत्यारित येत असलेल्या या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर १५ वर्षांपूर्वी ११ नोव्हेंबर २००८ रोजी पहिली पूर्णा-अकोला पॅसेंजर धावली. त्यामुळे वाशिम, हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या. या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी गाड्या सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, दक्षिण-मध्य रेल्वेकडून या मार्गावर मालगाड्याच अधिक चालविण्यात आला.

या मार्गासोबत दक्षिण-मध्य रेल्वे दुजाभाव करत असल्याची भावना या भागातील नागरिकांमध्ये आहे. गत १५ वर्षात अकोला-पूर्णा मार्गावर १ हमसफर, ७ सुपरफास्ट, ९ एक्स्प्रेस, ६ साप्ताहिक फेस्टिव्हल विशेष व १ पॅसेंजर अशा केवळ २३ रेल्वे धावत आहेत. अकोला-पूर्णा मार्गाचे विद्युतीकरण पूर्णा आऊटरपर्यंतच पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या मार्गावर अजूनही पूर्णपणे विद्युत इंजिनने धावणारी रेल्वे गाडी सुरू करण्यात आलेली नाही. गेल्या १५ वर्षात या मार्गावर अकोलावरून सुरुवात होणारी एकही नियमित धावणारी लांब पल्ल्याची नवीन ट्रेन सुरू करण्यात आली नाही.

या आहेत प्रलंबित मागण्या- पॅसेंजरची संख्या वाढविणे- अकोला स्थानकांवर पिट लाईन बनविणे- नांदेड स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे अकोला स्थानकावरून सुरू करणे- दक्षिण-मध्य रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडणे. 

अकोला - पूर्णा मार्ग उत्तर - पूर्व राज्यांकरिता रेल्वे सुरू कराव्यात, तसेच अकोला - पूर्णा मार्गाचे इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण करून सोबतच मार्गाचे डबलिंग काम सुरू करावे.- राकेश भट, झेडआरयूसीसी सदस्य, हिंगोली

नांदेड - मुंबई नियमित रेल्वे सुरू करावी. मध्य व दक्षिण मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म जोडणी पूर्ण करून उत्तर - दक्षिण जाणाऱ्या रेल्वे प्लॅटफॉर्म ४, ५, ६ वर उभी कराव्यात. अकोला इंटरसिटी खंडवापर्यंत विस्तारित करावी.- ॲड. अमोल इंगळे, रेल्वे प्रवासी संघटन, अकोला

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkolaअकोला