जामठी बु. : येथून जवळच असलेल्या अकोली जहागीर येथील शेतकºयाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता घडली. मधुकर शिवराम काळे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.मधुकर काळे हे शेतात पाणी देण्यासाठी शनिवारी सकाळी गेले होते. पाणी देत असताना त्यांचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने त्यांना जबर शॉक लागला. त्यामुळे त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. परिसरात भारनियमन सुरू असल्याने शेतकरी रात्री-बेरात्री जाऊन पिकाला पाणी देत आहेत, यातूनच ही घटना घडली. त्यामुळे भारनियमन बंद करण्याची मागणी होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांच्याकडे चार एकर जमीन आहे. शेतावर कर्जसुद्धा आहे. याप्रकरणी माना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. नलावडे करीत आहेत. (वार्ताहर)
अकोला : पिकाला पाणी देत असताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 6:48 PM
जामठी बु. : येथून जवळच असलेल्या अकोली जहागीर येथील शेतकºयाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता घडली. मधुकर शिवराम काळे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.मधुकर काळे हे शेतात पाणी देण्यासाठी शनिवारी सकाळी गेले होते. पाणी देत असताना त्यांचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने त्यांना ...
ठळक मुद्देअकोली जहागीर येथील घटना शेतकरी रात्री-बेरात्री जाऊन पिकाला पाणी देत आहेत.