रुईखेड (अकोला) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रुईखेड येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली. रमेश बाळकृष्ण कोकाटे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.रमेश कोकाटे यांच्याकडे चार एकर सामूहिक शेती आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून अपेक्षेनुसार उत्पन्न होत नव्हते. अशातच त्यांनी शेतीच्या मशागतीसाठी आणि इतर कामांसाठी महाराष्ट्र बँक पणज शाखेचे १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांना शेतात यावर्षीही चांगले उत्पादन न झाल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी २ मार्च रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गळफास घेतल्यााचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले. ३ मार्च रोजी शवविच्छेदनानंतर त्यांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)
अकोला : रुईखेड येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 6:45 PM
रुईखेड (अकोला) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रुईखेड येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली.
ठळक मुद्देरमेश बाळकृष्ण कोकाटे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.रमेश कोकाटे यांच्याकडे चार एकर सामूहिक शेती आहे.शेतीच्या मशागतीसाठी आणि इतर कामांसाठी महाराष्ट्र बँक पणज शाखेचे १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.