अकोला: समग्र शिक्षा अभियानातर्गंत जिल्ह्यातील ६८ हजार एससी, एसटी, दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मोफत शालेय गणवेशासाठी शासनाने ४ कोटी ८ लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषदेला दिला होता. परंतु सीईओ सुटीवर असल्याने, हा निधी रखडला होता. यासंदर्भात लोकमतने गणवेशाचा घोळ सदराखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, जि.प. सीईओंनी उप मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देऊन गणवेशाचा मार्ग मोकळा करण्यास सांगितले. अखेर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांनी फाईलवर स्वाक्षरी केल्यामुळे शालेय गणवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.यंदा २0१८-१९ मध्ये ६८ हजार १५८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने ४ कोटी ८ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. परंतु शाळा सुरू होऊन महिना झाला तरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अद्याप मिळाला नाही. शेकडो पालकांना तर स्वखर्चातून गणवेश खरेदी करावा लागला. शालेय गणवेशासाठी ४ कोटी रूपयांचा निधी पाठवून महिना झाला. केवळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुटीवर असल्यामुळे गणवेशाच्या निधीची फाईल अडकून पडली होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्यांना निधीसाठी प्रतिक्षा करावी लागत होती. निधीच्या फाईलवर स्वाक्षरी होत नसल्याने, पंचायत समिती स्तरावर गणवेश कापडाची खरेदी लांबणीवर पडली होती. यासंदर्भात लोकमतने गणवेशाचा घोळ असे वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत, जि.प. सीईओंनी घेतली आणि प्रभारी सीईओंना गणवेश निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार दिले. त्यामुळे प्रभारी सीईओ कुलकर्णी यांनी तातडीने गणवेश निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करून गणवेशाचा मार्ग केला. शिक्षण विभागाने हा निधी गटशिक्षणाधिकारी स्तरावर वितरीत केला असून, लवकरच या निधीचे प्रत्येक तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समित्यांना वाटप करण्यात येणार आहे.
असे होईल निधीचे वाटपअकोला- ८0२६२00 अकोट- ६६४८000बाळापूर- ५८६८000बार्शिटाकळी- ४६९१४00मुर्तिजापूर - ४0४१000पातूर- ३६४६२00तेल्हारा- ५0८२000जि.प. सीईओ सुटीवर असल्यामुळे गणवेश निधीची फाईल थांबली होती. परंतु आता त्यांच्या आदेशानुसारच प्रभारी सीईओंनी ४ कोटी ८ लाख रूपयांच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे निधीचे गटशिक्षणाधिकारी स्तरावर वितरण करण्यात आले. लवकरच शाळा व्यवस्थापन समित्यांना हा निधी पाठवून गणवेशाचे कापड खरेदी करण्यात येईल.देवेंद्र अवचार, शिक्षणाधिकारीप्राथमिक, जि.प.