लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री/उमरा (अकोला): चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत उमरा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी लाखो रुपयांचा एवज लंपास केला आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. उमरा येथील नामदेव लालु पवार यांच्या घरातील कपाट व लोखंडी पेटीत ठेवलेले अंदाजे जवळपास तिन लाखांचे सोन्याचे दागिणेसह रोख १५ हजार रुपये, आत्माराम लक्ष्मण तरास यांचे घरातील ६ हजार रुपये, भुराभाई राठोड यांचे घरातील रोख ६ हजार रुपये, देवकाबाई माळोकार यांचे घरातील रोख ५ हजार रुपये, रुपाली गणेश ठाकरे यांचे घरातील ६ हजार रुपये असे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. पाच घरांमधील सोने व चांदीचे दागिणे, तसेच घरात ठेवलेले तूप, भुईमुंगाच्या शेंगा, तीळ व गुंड भांडे असा लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच बाळापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख व चान्नी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.तसेच ठसे तज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सदर अज्ञात चार चोरटे दुचाकीने गावात फिरतांना रात्री १ वाजताच्या सुमारास गावातील एका महिलेने पाहिले. परंतु तिने भीतीमुळे याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. पोलिसांनी रात्रीचे गस्त करण्याची मागणी होत आहे.
अकोला : उमरा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या; लाखो रूपयांचा ऐवज लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 7:00 PM
खेट्री/उमरा (अकोला): चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत उमरा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी लाखो रुपयांचा एवज लंपास केला आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्दे१३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आल्या घरफोड्या घरफोडीच्या घटनेमुळे गावासह परिसरात एकाच खळबळ