लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाळ्यात वातावरणात मोठे बदल झाल्याने विषाणूजन्य, कीटकजन्य व जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. टायफॉइड, ताप, सर्दी, पडसे, कॉलरा, अतिसार अशा विविध आजारांचे रुग्ण वाढल्याने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) नेहमीपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे चित्र गत दोन आठवड्यांपासून पाहावयास मिळत आहे.पावसाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव व थंड वातावरण यामुळे वातावरणात रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. सर्वत्र घाण साचल्याने भूमिगत जलस्रोत दूषित होतात, तसेच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्तीही वाढीस लागते. रोगजंतूंसाठी असे पोषक वातावरण निर्माण झाल्याने जिल्ह्यात विविध रोगांनी डोके वर काढले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार, जुलाब, हगवण अशी लक्षणे असलेले रुग्ण घराघरांमध्ये आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे असलेले रुग्णही दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. पावसाळ्यात आर्द्र वातावरणामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यू, मलेरिया या आजारांचा धोका कायम आहे. विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण खासगी दवाखान्यांसह सर्वोपचार रुग्णालयात गर्दी करीत आहेत. एरव्ही सर्वोपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० ते १७०० रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु गत दीड ते दोन आठवड्यांपासून २००० ते २३०० पर्यंत रुग्ण उपचारासाठी येत असल्याची नोंद सर्वोपचार रुग्णालयात आहे.पुरेसा औषधसाठा उपलब्धपावसाळ्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी दररोज मोठ्या प्रमाणात येणाºया रुग्णांना पुरेल एवढा औषधसाठा सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगितले.
‘सर्वोपचार’ची ‘ओपीडी’ फुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 2:12 AM