लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयात कोविड वार्डात कार्यरत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विद्यावेतनासोबतच कोविड भत्ता दिला जात आहे; मात्र येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अद्यापही कोविड भत्ता लागू करण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १२० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड वार्डात रुग्णसेवा देण्यास नकार दिला आहे. कोविड वार्डात रुग्णसेवा द्यावी म्हणून जीएमसी प्रशासनाकडून कारवाईचा धाक दाखविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सर्वोपचार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मागील सहा महिन्यांपासून नॉन कोविडसह कोविड वार्डातही निरंतर रुग्णसेवा देत आहे. कोविडमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला कोविड भत्ता दिला जातो. राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनाही हा भत्ता लागू आहे; मात्र अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अद्यापही हा भत्ता लागूकरण्यात आला नसल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळेच त्यांनी गुरुवारपासून कोविड वार्डात रुग्णसेवेला नकार दिला; मात्र त्यांनी नॉनकोविड वॉर्डातील रुग्णसेवा कायम ठेवली. असे असतानाही, त्यांनी कोविड वार्डात रुग्णसेवा द्यावी, यासाठी जीएमसी प्रशासनाकडून त्यांना कारवाईचा धाक दाखविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आतापर्यंत १६ प्रशिक्षणार्थी ‘पॉझिटिव्ह’प्रशिक्षणार्थी डॉक्टर रात्रंदिवस कोविड वार्डात रुग्णसेवा देत आहेत. रुग्णसेवा देताना आतापर्यंत १६ प्रशिक्षणार्थी डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. यातील काही डॉक्टरांना दोन वेळा कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.प्रशिक्षणार्थींनीच दिला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव!४जीएमसी प्रशासनाने अद्यापही जिल्हाधिकाºयांकडे कोविड भत्त्याचा प्रस्ताव न दिल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी गुरुवारी स्वत:च जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन कोविड भत्त्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकाºयांना कालच प्रस्ताव दिला असून, प्रशिक्षणार्थींना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. या कालावधीत त्यांचा प्रश्न मार्गी लागेल.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, उपअधिष्ठाता,जीएमसी, अकोला.