ठळक मुद्दे नवीन अधिष्ठातापदी डॉ. शिवहरी घोरपडे यांच्या नावाची चर्चा. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रभार डॉ. कुसुमाकर घोरपडे सांभाळत आहेत.
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आगामी दोन दिवसात नवे अधिष्ठाता रुजू होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन अधिष्ठाता येणार असल्याची चर्चा सोमवारी जीएमसीत वर्तुळात चर्चेचा विषय होता. नवीन अधिष्ठातापदी डॉ. शिवहरी घोरपडे यांच्या नावाची चर्चा असून, येत्या दोन दिवसात ते अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नवे अधिष्ठाता मिळाले असले, तरी ते प्रभारीच असणार आहेत. सध्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रभार डॉ. कुसुमाकर घोरपडे सांभाळत आहेत.