शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

Akola GMC : डिजिटल एक्स-रे मशीनला इन्स्टॉलेशनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 2:53 PM

अद्यापही डिजिटल एक्स-रे मशीनचे इन्स्टॉलेशन झाले नाही.

अकोला : अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने आजारांचे निदान व्हावे, यासाठी सर्वोपचार रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन दाखल झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मितीही करण्यात आली आहे; मात्र अद्यापही डिजिटल एक्स-रे मशीनचे इन्स्टॉलेशन झाले नाही.विविध आजारांच्या निदानासाठी सर्वोपचार रुग्णालयात एक्स-रे सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी रुग्णांच्या आजाराचे निदान तर होते; पण रुग्णांना एक्स-रे फिल्म दिली जात नाही. त्यामुळे रुग्ण पुढील उपचारासाठी खासगी किंवा अमरावती किंवा नागपूरला गेल्यास त्याला एक्स-रे फिल्मसाठी स्वतंत्र मागणी करावी लागते. या प्रक्रियेत रुग्णाचा वेळही जातो. हा प्रकार टाळण्यासाठी तसेच आजारांचे निदान अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे या उद्देशाने डिजिटल एक्स-रे मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली; मात्र अद्यापही या एक्स-रे मशीनचे इन्स्टॉलेशन झालेले नाही. त्यामुळे रुग्णांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे आजाराच्या निदानासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रखडली असून, लवकरच रुग्ण सेवेत ही एक्स-रे मशीन येणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.‘एक्स-रे’ची मिळणार डिजिटल प्रिंटआतापर्यंत रुग्णांना एक्स-रे फिल्म दिली जायची. काही दिवसांपासून ही फिल्म देणेही बंद करण्यात आले; मात्र डिजिटल एक्स-रे मशीनच्या इन्स्टॉलेशननंतर रुग्णांना डिजिटल प्रिंट दिली जाणार आहे.

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला