- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या वाढत्या मृत्युदरावर नियंत्रण ठेवणे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान असून, यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची महत्त्वाची भूमिका आहे. १४ आॅगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मृत्युदर रोखण्यामध्ये अकोला जीएमसी राज्यात पाचव्या स्थानी आहे. येथील मृत्युदर हा ६.२८ टक्के आहे. तर सर्वाधिक ३४.२७ टक्के मृत्युदर पुणे बीजेजीएमसीचा असून, सर्वात कमी ०.२१ टक्के मृत्युदर मुंबई येथील कामा हॉस्पिटलचा आहे.राज्यातील सर्वच २० शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णलये कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आल्याने या वैद्यकीय महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची आहे.या सर्वच संस्था कोविडचा मृत्युदर कमी करण्यासाठी झटत आहेत.त्यातील काही संस्थांना यामध्ये यश मिळत असले, तरी आठ संस्थांची स्थिती गंभीर आहे. या आठ संस्थांमधील मृत्युदर १० पेक्षा जास्त आहे.राज्यातील आरोग्य यंत्रणा कोविड विरुद्धचा लढा निरंतर लढत आहे; मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार केल्यास या संस्थांवर जबाबदारी अधिक आहे. विशेषत: मृत्युदर कमी करण्यात काही संस्था यशस्वी प्रयत्न करीत असून, त्यामध्ये अकोला जीएमसीची स्थिती चांगली आहे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, उपअधिष्ठाता, जीएमसी, अकोला
मृत्युदर रोखण्यात अकोला जीएमसी राज्यात पाचव्या स्थानी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 4:47 PM